Breaking News

रस्ते खोदणार्यांकडून दंड वसुली करा

माथेरान भाजपची मागणी

माथेरान : रामप्रहर वृत्त

येथील रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकने केले जात आहेत मात्र माथेरान जल प्राधिकरण किंवा काही लोक हे रस्ते खोदून जलवाहिनी टाकत आहेत. या रस्ते खोदणार्‍यांकडून दंड वसुली करावी, अशी मागणी माथेरान भारतीय जनता पक्षाने मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे.

मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने माथेरानमधीकल रस्ते व अनेक पॉईंट सुशोभित झाले आहेत. क्ले पेव्हर ब्लॉकने केलेले रस्ते दीर्घकाळ टिकविणे गरजेचे आहे पण जल प्राधिकरण तसेच काही नागरिक नव्याने केलेले खोदून जलवाहिन्या टाकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माथेरान भाजपने त्याबद्दल पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांच्याकडे तक्रार केली. आणि विनापरवानगी रस्ते खोदणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. संबंधीत  ठेकेदाराने वेळेत काम न करता नवीन रस्ते खोदल्यास त्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली.

भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, किरण चौधरी, चंद्रकांत जाधव,प्रदीप घावरे, दीपक शाह आदींनी हे निवेदन पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांना दिले.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply