Breaking News

हरियाणाची पुण्यावर मात; तर तेलुगू टायटन्सने नोंदवला पहिला विजय!

प्रो कबड्डी लीग

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 37-30 असा पराभव केला. हरयाणा स्टीलर्सचा हा चौथा विजय आहे, तर अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील पुणे संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

हरियाणा स्टीलर्सच्या जयदीप आणि मोहितने उत्कृष्ट कामगिरी करीत हाय-5 पूर्ण केले. दोघांनी टॅकलद्वारे प्रत्येकी सात गुण मिळवले. त्याच्याशिवाय पुणेरी पलटणच्या संकेत सावंतने तीन टॅकल गुण मिळवले. रेडिंगमध्ये विकास कंडोलाने आठ आणि विश्वासने सात गुण मिळवले.

दुसर्‍या सामन्यात तेलुगू टायटन्सने स्पर्धेतील आपला पहिलावहिला विजय नोंदवला. रोमहर्षक सामन्यात त्यांनी जयपूर पिंक पँथर्सचा 35-34 असा पराभव केला. जयपूरच्या अर्जुन देशवालने सामन्यात सर्वाधिक 13 गुण घेतले, तर दीपक निवास हुडाने आठ गुणांची कमाई केली. टायटन्स संघाकडून आदर्शने नऊ, तर रजनीश दलालने सात गुण घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply