रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून 40 लाखांचा निधी
पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील जोहे, कळवे, दादर, रावे आजूबाजूच्या गावांमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या विभागात मैदानाची उणीव भासत, जाणवत होती. यामुळे आमदार रविशेठ पाटील यांनी मैदानासाठी चाचपणी करून शासनाच्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करीत गुरुवारी (दि. 20) जोहे ग्रामपंचायत हद्दीत कळवे गावामध्ये असलेल्या सहा एकरावर भव्य दिव्य असे मैदानाचे भूमिपूजन जि.प. माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सहा एकरावर होणार्या भव्यदिव्य मैदानासाठी रविशेठ पाटील आमदार फंडातून 40 लाखांचा निधी दिला असून मैदान होण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले.
या वेळी जोहे ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ मोकल, प्रमिला गणेश मोकल, लक्ष्मी गोपीनाथ मोकल, उपसरपंच गणेश घरत, दादर सरपंच विजय पाटील, माजी सरपंच काशिनाथ पाटील, गणेश मूर्तिकार अध्यक्ष अभय म्हात्रे, हमरापूर विभाग प्रमुख नरेंद्र पाटील, सदस्य सुदर्शन पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, सूर्यहास पाटील, तांबडशेत माजी सदस्य भरत पाटील , नितिन मोकल, जोहे माजी सदस्य शंकर मोकल, गणेश मोकल तसेच ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
या वेळी वैकुंठ पाटील यांनी सांगितले की आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या कामाचा झंजावात सुरू ठेवत या विभागातील रस्त्यांसाठी तीन कोटींचा निधी आणला असून या विभागातील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होतील, तसेच या विभागासाठी आरोग्य केंद्रही लवकरच उभारणार आहोत. मैदान पूर्ण झाल्यावर भव्यदिव्य आमदार चषक नाईट क्रिकेट स्पर्धा भरविणार आहोत. या वेळी जोहे ग्रामपंचायतीतर्फे वैकुंठ पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.