Breaking News

सर्वोत्तम कसोटी संघात रोहितसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान

दुबई ः वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, मात्र विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

याआधी, आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-20 आणि वनडे संघामध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव नव्हते. आयसीसीच्या टी-20 आणि वनडे संघाचा कर्णधार बाबर आझम कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही.

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी प्रभावी नेता आहे. वर्षाच्या सुरुवातीला साउथम्प्टनमध्ये भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याने चार सामन्यात 65.83च्या सरासरीने शतकासह 395 धावा केल्या. संघात समाविष्ट असलेल्या तीन भारतीय खेळाडूंपैकी रोहित शर्माची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

कसोटी संघ ः दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लॅबुशेन, जो रूट, केन विल्यमसन (कप्तान), फवाद आलम, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, काइल जेम्सन, हसन अली, शाहीन आफ्रिदी.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply