Breaking News

मोहोपाडा परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव

मोहोपाडा : प्रतिनिधी

नव्या वर्षात वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रानचा शिरकाव आणि परिसरात झपाट्याने वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या नागरिकांसमोर संकट बनले आहे. अनेकांनी कोरोना आजारावर यशस्वी मात केली आहे. तरीही सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात मिळालेल्या आकडेवारीवरून 177 कोरोनारुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे  पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती. या वेळी नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हरविले होते, तसेच कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेवरही विजय मिळविला होता. आता तिसरी कोरोना लाट नागरिकांसमोर आव्हान ठरत आहे. वासांबे (मोहोपाडा) कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख नववर्षाच्या सुरुवातीपासून वाढतच आहे.

सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात विभागात 21 जानेवारीपर्यंत एकूण 177 रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक झाली आहे. यात वासांबे (मोहोपाडा) हद्दीतील कोरोनावर 1913 जणांनी मात केली आहे. तर 62 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने होत आहे.

दरम्यान, परीसरात सर्दी, खोकला व तापाचे साथीच्या आजाराचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रसायनी परीसराचा रिस, चांभार्ली, मोहोपाडा, वावेघर येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते.वातावरणातील बदल आणि कोरोनाच्या भीतीने परीसरात सर्दी, खोकला, तापाची साथ असली तरी नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांचा बिनधास्तपणा त्यांच्या आरोग्यावर बेतू शकतो. याकरिता    कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला परिसरातून हद्दपार करावा, अशी तज्ञांकडून विनंती होत आहे. कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने होत आहे.

शुक्रवारपर्यंतची गावनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

मोहोपाडा              46

रिस परिसर           35

नविन पोसरी        5

चांभार्लीं  11

शिवनगर              1

आली आंबिवली    5

लोधिवली परिसर 63

पानशिल               0

तळेगाव                3

रिसवाडी 1

भटवाडी  0

तळेगाव वाडी        0

पराडे       1

खाने आंबिवली     4

कांबे        2

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply