Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.
मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 टक्के रेटिंगसह प्रथम क्रमांकावर आहेत. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर (66 टक्के), इटलीचे पंतप्रधान मारिया द्राघी (60 टक्के), जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (48 टक्के), जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ (44 टक्के), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (43 टक्के), कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (43 टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (41 टक्के), स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ (40 टक्के) व कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए (40 टक्के) असे टॉप टेन नेते आहेत.
या यादीच्या तळाशी 11व्या स्थानी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, 12व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि 13व्या स्थानी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. बोल्सोनारो यांना 37 टक्के, मॅक्रॉन यांना 34 टक्के, तर जॉन्सन यांना अवघी 26 टक्के मते मिळाली आहे.
नोव्हेंबर 2021मध्येही जगातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. लोकप्रिय नेत्यांची रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. याच वेबसाइटने मे 2020मध्ये पंतप्रधान मोदींना 84 टक्के मंजुरीसह सर्वोच्च रेटिंग दिली होती. ताजी रेटिंग 13 ते 19 जानेवारीदरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply