Breaking News

खासदार अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, ते फक्त कलाकार नाहीत. त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करू नये, असे पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लागला आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या संदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतला आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, अशी भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी, अमोल कोल्हेंनी ती भूमिका पक्षामध्ये प्रवेश करण्याआधी साकारली असून एक कलाकार म्हणून माझा त्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply