Breaking News

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा

भाजप वाहतुक सेलची तक्रार

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबइ-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करताना फेरीवाल्यांचा अडथळा होत असल्याची तक्रार भाजप वाहतूक सेल पोलादपूर तालुका प्रमुख विश्वास नलावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलादपूर नगर पंचायतीमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही लेखी तक्रार सादर केली आहे.

पोलादपूर शहरातून अंडरपास जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वरील बाजूने नियोजित सर्व्हिस रोड जातो. सध्या पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरूनच कोकणात जाणार्‍या तसेच कोकणातून येणार्‍या वाहनांची दुहेरी वाहतुक सुरू असते. ही वाहतूक भविष्यातही पूर्वेकडील सर्व्हिसरोड वरूनच होत राहणार हे गृहित धरून या सर्व्हिसरोडवर फेरीवाले, वडापाव तसेच अन्य टपर्‍या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी या वेळी भाजप वाहतूक सेलच्या पदाधिकार्‍यांनी केली.

पोलादपूर नगर पंचायतीमधील कार्यालयीन अधिक्षकांना निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख विश्वास नलावडे, जिल्हा कमिटी सदस्य राजन धुमाळ, माजी रा. जि. प. सदस्य अनिल नलावडे, मंगेश शिंदे, नितीन बोरकर, योगेश भोसले, आबा बनसोडे आदी उपस्थित होते. या वेळी नगरपंचायतीमधील कार्यालयीन अधिक्षक महादेव सरंबळे यांनी हा अर्ज मुख्याधिकारी रोडगे यांना पुढील कार्यवाहीसाठी अवलोकनासाठी देण्याची ग्वाही दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply