Monday , June 5 2023
Breaking News

साई येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकांच्या भले करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 22) केले. पनवेल तालुक्यातील साई येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल तालुक्यातील साई ग्रामपंचायत हद्दीत उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 25 लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 86 ते साई जोडरस्ता, तसेच 10 लाख रुपये खर्चून साई येथील अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॅक बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या वेळी भाजप केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजप नेते विद्याधर जोशी, साई ग्रामपंचायते सरपंच अमृता तांडेल, उपसरपंच हिरामण मोकल, सदस्य नारायण पाटील, बाळकृष्ण ठाकूर, बेबीताई मोकल, पार्वती ठाकूर, मनोज ठाकूर, निलेश मोकल, अशोक पाटील, महेश  मोकल, दिलीप मोकल, विद्याधर मोकल, माजी सरपंच प्रवीण मोकल, कुणाल मोकल, नगराज मोकल, नारायण मोकल, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे दिनेश पाटील, केळवणे जि. प. विभागीय उपाध्यक्ष किरण माळी, राम मोकल, अनंता पवार, जगन वाघमारे, सचिन मोकल, सुजित पाटील, हेमंत पाटील, श्रीराम मोकल, दत्तात्रय म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, मिलन घरत, विश्वनाथ मोकल, नामदेव ठाकूर, तुकाराम मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply