मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमधील ताडदेव भागातील एका इमारतीला शनिवारी (दि. 22) सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ताडदेवमधील नाना चौकातील गांधी रुग्णालयाच्या समोरील 20 मजली कमला बिल्डिंगला शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग आग लागली. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आगीत जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे, तसेच आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना काही बड्या रुग्णालयांनी कोरोनाचे कारण देत दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास आयुक्तांना सांगणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …