Breaking News

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची एमजीएम रुग्णालयाला भेट; कोरोनाग्रस्तांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व देऊन समाजाची सेवा करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची संवाद साधून व्यवस्थेची पाहाणी केली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण आहे, परंतु अशा परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकसेवा हेच ध्येय मानणारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाचे या अनुषंगाने मनोधैर्य वाढवले आहे.
पनवेल येथील उपजिल्हा (कोविड) रुग्णालयाबरोबरच कामोठे येथील एमजीएम हेही कोविड रुग्णालय आहे. येथे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी एमजीएम हॉस्पिटलला भेट दिली. या वेळी त्यांनी तेथील डॉ. सुधीर कदम आणि हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. त्याचबरोबर सुरक्षेचे नियम पाळून कोविड वार्डमध्ये जाऊन सुविधांची पाहणी केली तसेच कोरोनाग्रस्त नागरिकांशी सुसंवादही साधला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भाग तसेच उरणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात या आजाराचा संसर्ग झालेला आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वात अगोदर पनवेल उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केले होते. येथील सर्वसाधारण ओपीडी पनवेल महापालिकेच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आली. त्याचबरोबर प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येते. वाढत्या रुग्णांचा विचार करता एमजीएम रुग्णालयसुद्धा कोविड हॉस्पिटल जाहीर करण्यात आले.
या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे दररोज रुग्ण जिल्ह्यातून येत आहेत. या रुग्णालयातून काही जण बरे होऊनही घरी गेले आहेत.
व्यवस्थेचा घेतला आढावा
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी एजीएम रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. त्याचबरोबर उपचारांदरम्यान येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. या दोन्ही कार्यतत्पर आमदारांनी रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिकची काय व्यवस्था करावी लागेल याबाबतही चर्चा केली तसेच डॉ. सुधीर कदम, वरिष्ठ डॉक्टर, निष्णांत वैद्यकीय कर्मचारी यांचे पथक उत्कृष्ट काम करीत असल्याचे सांगून एमजीएम हॉस्पिटल व्यवस्थापनाचे कौतुक केले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply