Wednesday , June 7 2023
Breaking News

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खोपोली : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ खोपोली शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23) येथील लोहाणा समाज सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 94 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रा. स्व. संघ जिल्हा बौद्धिक प्रमुख आनंद जोशी (पनवेल) व लोहाणा समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश विठलानी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कोविड-19चे नियम पाळून नोंदणी केलेल्या रक्तदात्यांना ठरवून दिलेल्या वेळेत निमंत्रित करण्यात येत होते. समर्पण ब्लड बँक (मुंबई)चे डॉ. विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स व तंत्रज्ञ लता दिसले, स्नेहल कांबळे, अनिता राऊळ, सज्जाद शेख, अजय देवरूखकर, रोहन साळवी, अक्षय कदम, सोहन जाधव, सुजल सोने, अभिषेक मौर्य आदींनी शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य केले. रा. स्व. संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख राकेश पाठक, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, महामार्ग प्रमुख रोहित कुलकर्णी, खालापूर तालुका कार्यवाह अविनाश मोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र जाखोटिया, खालापूर संपर्कप्रमुख सुधाकर भट, साजगाव विभागाचे प्रमुख कार्यकर्ते गौरव तटकरे, अतुल कोठारी, जयेश अभानी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply