मुंबई ः प्रतिनिधी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ट्रेंट बोल्ट आयपीएल स्थगित झाल्यानंतर सुखरूप मायदेशी परतला आणि खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल त्याची फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचे आभार मानले. इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिताना बोल्टने माणूस आणि खेळाडू या दोन्ही भूमिकेत भारताने बरेच काही दिले आहे. कोरोना काळात भारताला पाहताना वाईट वाटते, असेही भावूकपणे नमूद केले आहे.
आपल्या पोस्टमध्ये बोल्ट म्हणाला, भारतीयांना पाहून हृदय हेलावले. आयपीएल संपल्यानंतर मुंबई इंडियन्सची टीम सोडल्याबद्दल मला वाईट वाटते. भारत एक अशी जागा आहे, जिथे मला एक क्रिकेटर आणि व्यक्ती म्हणून खूप काही मिळाले आहे. माझ्या
भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा मी नेहमीच आदर केला. ही एक खेदजनक वेळ आहे आणि मला आशा आहे की गोष्टी लवकरच सुधारतील. मी या सुंदर देशात परत येण्याची वाट पाहत आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …