Breaking News

मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा घाट : आमदार महेश बालदी

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने पर्ससीन मच्छीमारसोबत सर्वच मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. अस्मानी संकटापेक्षा सुलतानी पेशाचा त्रास या मच्छीमार बांधवांना सहन करावा लागत आहे, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी केली.

शासनाने पर्ससीन मच्छीमारीवर बंदी घातल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या या जाचक धोरणाविरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्ससीन मच्छीमार बांधवांनी 20 जानेवारीपासूम बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मंगळवारी (दि. 25) आमदार महेश बालदी यांनी उपोषणकर्ते मच्छीमारांची भेट घेतली. मच्छीमारांच्या या लढ्यात भाजप तुमच्यासोबत असून याबाबत केंद्रात आवाज उठवणार असे आश्वासन आमदार बालदी यांनी या वेळी मच्छिमारांना दिले.

पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे तसा आधुनिक काळातील पर्ससीन मासेमारी करणारा मच्छीमारही जगला पाहिजे. जुन्या पद्धतीने व्हलव्याने मच्छीमार होडी चालवून मासेमारी करीत होता, अजून त्याने तसेच राहावे का, असा प्रश्नही आमदार बालदी यांनी उपस्थित केला आहे.

मच्छीमार हा बारा वावच्या बाहेर जाऊन मासेमारी करीत असेल तर राज्य शासनानेही याबाबत सकरात्मक राहिले पाहिजे. मात्र जाचक अटी लावून मच्छीमाराला उद्ध्वस्त करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही मच्छीमार बांधवांच्या सोबत आहोत, असेही आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply