नेरे येथून बसफेर्या कमी करण्याची चालकांची मागणी
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केली अधिकार्यांशी चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त
नेरे येथून एनएमएमटी बसेसच्या फेर्या कमी करण्यात याव्या, जेणेकरून येथील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. या मागणीसंदर्भात भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आसुडगाव येथील एनएमएमटी डेपोच्या अधिकार्यांसोबत चर्चा केली.
नेरे येथून दोन एनएमएमटीच्या दोन बसेस सोडण्यात येतात. यामुळे येथील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो, म्हणून येथून एकच एनएमएमटी बस सोडण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयासंदर्भात आसुडगाव येथील एनएमएमटी डेपोच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली. या वेळी अधिकार्यांनी वरिष्ठांपर्यंत ही मागणी पोहचवतो असे सांगत दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे दोन दिवसांत निर्णय घेतला नाही, तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अरुणशेठ यांच्या समवेत येथील सर्व रिक्षाचालक पुढील कार्यवाही करतील, असे या वेळी एनएमएमटीच्या अधिकार्यांना सांगण्यात आले.
या बैठकीला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक व रिक्षाचालक उपस्थित होते.