Breaking News

डिझेल चोरी करणार्‍या आरोपींना अटक

पनवेल : बातमीदार, वार्ताहर

तळोजा पोलीस ठाण्याच्या औद्योगिक क्षेत्रात डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना तांत्रिक तपासाद्वारे तळोजा पोलीस ठाणे कडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीचे 350 लिटर डिझेल व चोरीसाठी वापरण्यात येणारे तीन चारचाकी वाहने असा एकूण 15 लाख 27 हजार 650 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळोजा येथील औद्योगिक क्षेत्रात उभ्या असणार्‍या गाड्या मधून डिझेलची चोरी करण्यात येत होती. गाड्यांच्या टाक्यामधून हे आरोपी डिझेल चोरून न्यायचे. आणि रस्त्याला वाहने थांबवून त्यांना कमी किंमतीत डिझेल विकायचे. आरोपी वेगवेगळ्या गाड्या वापरुन रात्री आणि पहाटे गाड्यांतुन डिझेल चोरायचे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर निकम, विजय पवार व त्यांच्या पथकाने कोपरखैरने येथून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 27 हजार रुपयांचा डिझेल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply