नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
म. ए. सो.च्या नवीन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी भांडारकर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, संशोधक डॉ. प्रमोद जोगळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी माध्यम, माध्यमिक विभागाच्या मुख्याद्यापिका मानसी वैशंपायन यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. डॉ. जोगळेकर यांच्या हस्ते भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अप्रसिद्ध नायकांच्या कार्यावर प्रकाश टाकणार्या विद्यालयाच्या ’संवाद’ व इंग्रजी माध्यमाच्या ’रिफ्लेक्शन’ या पाक्षिकांच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीशा देवरे यानी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सर्व माध्यमांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते. सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांनी ऑनलाइन उपस्थित राहून ध्वजास मानवंदना दिली.