Breaking News

‘अटल करंडक’च्या आयोजनाचे कौतुक

पनवेल ः नितीन देशमुख
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे कलाकार, प्रेक्षक व रंगकर्मींनी कौतुक केले आहे.

आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन सुंदर झाले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही लसीकरण सर्टिफिकेट पासून त्यांचे तापमान मोजण्यापर्यंत सगळ्याची काळजी घेऊन स्पर्धकांना सेफ्टी किट देऊन त्यांची काळजी घेऊन एखादी संस्था मोठी स्पर्धा घेत असते ते अभिनंदनीय आहे. आमदार प्रशांत ठाकुर त्यांच्या टिमचे मनपूर्वक अभिनंदन. मी आणि माझी टिम या ठिकाणी खास जळगावहून या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहोत.
-विशाल जाधव, केंद्र समन्वयक, जळगाव

अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन चांगले आहे. मी अंतिम फेरीला आवर्जून आलो, कारण मला एकांकिका करण्याचा आणि बघण्याचा अनुभव आहे. मी राज्य नाट्यस्पर्धेत काम केलेले आहे. आयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. प्रवेशद्वारापासून त्यांनी लावलेली पोस्टर त्यांचा डिस्प्ले केला आहे तो वाखणण्यासारखा आहे. सकाळपासून पाहिलेल्या तिन्ही एकांकिका दर्जेदार होत्या. परीक्षक ही नावाजलेले असल्याने स्पर्धेचा निकाल चांगलाच लागेल याची खात्री वाटते.
-नंदकुमार शिपुरकर, खारघर

अटल करंडक एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी मी दरवर्षी येते. या स्पर्धेतील एकांकिका दर्जेदार असतात. आमच्यासारख्या नाट्य रसिकांना एक मेजवानीच मिळते. त्यामुळे आमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील व्यवस्था खूप चांगली आहे. सॅनिटाईज करून आपली पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
-विशाखा डोंगरदिवे, सेंट थॉमस स्कूल, शिक्षिका, नवीन पनवेल

आम्ही रायगडमधून अटल करंडक प्राथमिक फेरीत गुज ही एकांकिका सादर केली होती. पहिल्या फेरीत प्रथम आल्याने अंतिम फेरी सादर केल्यावर लोकांच्या छान प्रतिक्रिया मिळाल्या. अटल करंडकचे आठवे वर्ष आठवणीत राहणारे आहे, कारण त्याचे आयोजन सुंदर आणि शिस्तबध्द केले आहे. स्पर्धा म्हटली की धम्माल, मनातली हुरहूर या सगळ्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. अटल करंडक असेच पुढे पुढे चालत राहो आणि आम्ही छान अनुभव घेत राहो यासाठी आयोजकांना शुभेच्छा!
-ज्योती बावधनकर, राऊळ, अलिबाग

अटल करंडकशी माझे वैयक्तिक एक वेगळे नात आहे. ती मल्हार करंडक नावाने चालू होती त्यावेळी 2011चा उत्कृष्ट अभिनेता होतो, तर आज माझ्याबरोबर गुजमध्ये काम करणारी ज्योती बावधनकर-राऊळ त्यावेळची उत्कृष्ट अभिनेत्री होती, पण आम्ही वेगवेगळ्या संघातून काम केले होते. आज 10 वर्षांनी पुन्हा एकत्र येतोय ते एकाच संघातून हा आमच्यासाठी एक योगायोग आहे. तेव्हापासून बघतोय या स्पर्धेचे आयोजक हे कोणत्याही बाबतीत कमी पडणारे नाहीत. यावर्षीचे आयोजन कोरोना महामारीमुळे कठीण वाटत होते, पण आयोजकांनी ही स्पर्धा इतक्या सोप्या पद्धतीने आयोजित करून दाखवून दिले तो एक आदर्श आहे. अटल करंडक स्पर्धेशी माझे नाते अतूट रहावो हीच सदिच्छा!
-किरण साष्टे, अलिबाग

मी नॉन मराठी आहे. मला मराठी नाटक पहिल्यापासून पसंत आहेत. मराठी नाटकाचा अनुभव चांगला असतो. मी स्वत: एक नाटकार, कलाकार आहे. अटल करंडक हे नामांकित स्पर्धा आहे.त्यामुळे कलाकार, नाट्यलेखक, दिग्दर्शक यांना एक स्टेज मिळते. कोरोनानंतर पहिल्यांदा आम्ही कलाकार एकत्र आलो आहोत. चांगला मोहल आहे. खूप लोक जमलेत. चांगला अनुभव मिळत आहे. इथली व्यवस्था खूप चांगली आहे.
-रुद्र प्रतापसिंग, मुलुंड

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply