Breaking News

भाजपचे कै. राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट

महाड : प्रतिनिधी

माजी नगरसेवक तथा भाजपचे दिवंगत नेते राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 29) महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आला. या वेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेय आत्माराम भोसले यांच्या  दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त त्यांची पत्नी निलीमा भोसले आणि राजेय भोसले प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी महाड ग्रामीण रुग्णालयात वॉटर कुलर भेट देण्यात आला. तसेच रुग्णांना फळवाटप करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, संदिप ठोंबरे, निलिमा राजेय भोसले, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, डॉ. मंजुषा कुद्रीमोती, रोटरी क्लबचे प्रदिप शेठ, चंद्रजीत पालांडे, तुषार महाजन, आप्पा सोंडकर, सुमेध भोसले, अजित अवकीरकर, अरुण कारंडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापुरात रुग्णालयातील अनेक वस्तू, उपकरणे नष्ट झाली असून, रुग्णालयाला वॉटर कुलर दिल्याबद्दल डॉ.जगताप यांनी आभार मानले. यावेळी जयवंत दळवी, महेश शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply