Breaking News

माथेरानमध्ये पर्यटन उत्साह

माथेरान हे ब्रिटिशांनी 1950च्या दशकात शोधून काढलेले पर्यटनस्थळ आहे. माथ्यावरील रान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या थंड हवेच्या ठिकाणी पाहुणे आले, तर पर्यटन अन्यथा या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालत नाही. पर्यटकांच्या दृष्टीने जंगलात वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी वाहनांची वर्दळ नाही आणि त्यामुळे 2400 फुटावरील माथेरानचे आकर्षण सर्वांना आहे. या माथेरानमध्ये अन्य कोणत्याही प्रकाराचे व्यवसाय नसले तरी पर्यटनासाठी केवळ हे क्षेत्र राखीव असल्याने देशात कोरोना पार्शवभूमीवर आलेले निर्बंध यामुळे आज अनेक पर्यटनस्थळे पर्यटन व्यवसायासाठी बंद आहेत. त्याही स्थितीत माथेरान या पर्यटन स्थळावर पुन्हा नव्या जोमाने पर्यटन व्यवसाय करता येईल या एकमेव आशेवर असलेल्या माथेरानकर यांनी 25 जानेवारी हा आंतराराष्ट्रीय पर्यटन दिवस सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला आहे. या पर्यटन दिनाच्या निमित्ताने माथेरानमधील कला आणि संस्कृती, तसेच क्रीडा प्रकार यांचे दर्शन करून देण्याचा प्रयत्न झाला आहे. या पर्यटन दिनाचे वृत्तात आपल्यासाठी…

निसर्ग, संस्कृती आणि यजमानांचा करूया सन्मान… या उद्घोषाप्रमाणे माथेरानमध्ये आतंरराष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जात होता. यापूर्वी माथेरानमध्ये होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून गायले जाणारे माथेरान अभिमान गीताने माथेरान मध्ये पर्यटन दिन साजरा होऊ लागला. कविवर्य अरुण म्हात्रे यांनी लिहिलेल्या आणि गायिलेल्या ‘पर्यटनाच्या नवकौशल्यातून वाढवू माथेरानसह देशाची शान!’ या बीद वाक्याने या पर्यटन दिनाचा कार्यक्रमाला उपस्थित पर्यटकांनी देखील माथेरान अभिमान गीतामध्ये  करून जागतिक पर्यटन दिवस सुरू होऊ लागला. माथेरान या केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या पर्यटनस्थळावर कोरोना काळापासून निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे पर्यटक आले नाहीत तर मग पर्यटनावर अवलंबून असलेल्या येथील जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपले गाव काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न माथेरान मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने दाखवण्यात आले.कोरोनामुळे मागे गेलेले माथेरान येथील पर्यटन पुन्हा नव्या जोमाने आणि पूर्णभराने सुरू व्हावे आणि आगामी काळातील एप्रिल-मे-जून महिन्यातील पर्यटन हंगाम लक्षात घेऊन पर्यटन दिनाच्या माध्यमातून पर्यटन हंगाम चांगला जावा. शासनाचे असलेले प्रयत्न याला माथेरान कसे सज्ज आहेत हे पर्यटन दिनाच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने दाखवून दिले आहे.

पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करण्याींत यावा असे आदेश जारी करण्यात आले होते. त्याचा फायदा माथेरान पालिकेने सर्व दर्शनी भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी परिसर सजावट करण्यात आली होती. आंतराष्ट्रीय पर्यटन दिन माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेमार्फत कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून या दिवशी येणार्‍या पर्यटकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. माथेरानमध्ये पर्यटक ज्या वाटेने माथेरान मध्ये प्रवेश करतात त्या दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वारावर माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात होते. माथेरानमधील लोकनियुक्त सदस्य मंडळ यांचे मुदत 2 जानेवारी 2022 रोजी संपली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार सध्या प्रशासक यांच्या माध्यमातून सुरू आहे. असे असताना देखील माथेरान पालिकेचे काही निवडक लोकप्रतिनिधी पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त माथेरानमध्ये अश्वशर्यती, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले होते.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी माथेरानमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त हुतात्मा स्मारक ते नौरोजी उद्यान दरम्यान मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले जाते.त्यामुळ इंटरनेटवर माथेरान मध्ये पर्यटन दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धा भरविली आहे याची माहिती होताच पुणे-मुंबईतील मॅरेथॉनपटू यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यामुळे असंख्य पर्यटक देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेचे विशेष म्हणजे काही विदेशी पर्यटकदेखील या पर्यटन दिनाच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले असल्याने हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेतील बाजारपेठ मध्ये अथेलिस्ट जात असताना पुन्हा एकदा माथेरानमध्ये परदेशी पर्यटकांची पावले पडू लागली आहेत काय? याची आठवण झाली. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू माथेरानमध्ये मॅरेथॉन स्पर्धेसाठी पोहचल्याने स्पर्धा रंगली होती. या सर्व स्पर्धकांना नौरोजी गार्डन येथे माथेरान गिरिस्थान पालिकेकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

या पर्यटन दिनाच्या सोहळ्याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे घोड्यांचे संचलन आणि अश्व फॅशन शो हे होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला सुरुवात झाली. अश्वांचा फॅशन शो येथील श्रीराम चौकात रंगला तेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि माथेरानकर उपस्थित होते. या स्पर्धेत माथेरानमधील अश्वमालकांनी आपापल्या अश्वांना फुलांनी आणि रंगीबेरंगी झालर, गोंडे यांनी सजवले असल्याने हे घोडे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. अशाप्रकारे माथेरानमध्ये पर्यटकांच्या

सेवेत असलेल्या अश्वांची सजावट पाडव्याला माथेरानमध्ये अश्वमालक करीत असतात. माथेरानमधील सर्व पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त शपथही देण्यात आली.

आगामी पर्यटन हंगामाकडे लक्ष…

माथेरानसाठी एप्रिल ते जून या कालावधीत येणारा पर्यटन हंगाम हा माथेरानच्या पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा टप्पा असतो. ते लक्षात घेऊन आपले पर्यटनस्थळ पुन्हा पर्यटकांनी गाजवलेले असावे यासाठी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानिमित्ताने हा पर्यटन दिवस प्रशासक सुरेखा भणगे यांच्या माध्यमातून दिमाखदार साजरा झाला हे उपस्थित पर्यटक आणि स्थानिक यांच्या सहभागाने यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. दोन वर्षांपूर्वी विद्यमान सदस्य मंडळाने माथेरानमध्ये पर्यटन दिन साजरा करण्यात सुरुवात झाली होती. तिच परंपरा माथेरानमध्ये प्रशासक राजवट असताना सुरू ठेवल्याबद्दल मावळत्या सदस्य आणि पदाधिकारी यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply