पाली : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून एकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) रात्री सुधागड तालुक्यातील कोशिंबळे येथे घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. राजेश शंकर राजिवडे (वय 42, रा. कोशिंबळे, ता. सुधागड) शनिवारी (दि. 27) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास हा गावाबाहेर दारू पिण्यासाठी बसला होता. त्या ठिकाणी मारुती बाळू पडवळ (वय 76, रा. कोशिंबळे) हा गेला. त्याने राजेशच्या हातातून देशी दारूची बाटली हिसकावून घेतली. या वेळी झालेल्या बाचाबाचीतून राजेश राजिवडे याने मारुती पडवळ याला हाताबुक्क्याने व लाथेने मारहाण केली, तसेच खाली जमिनीवर पाडून दोन्ही हाताने त्याचा गळा दाबला. त्यानंतर त्याला खडकाळ जमिनीवर आपटून ठार मारले. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी राजेश राजिवडे यास अटक करण्यात आली आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …