Breaking News

सिमेंट बंधार्यामुळे किकवी परिसर जलसमृद्ध

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले होते. त्या निधीमधून तालुक्यातील किकवी येथे चिल्लार नदीवर सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. मे 2021 मध्ये बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यात पाणी अडविण्यात आले असून या बंधार्‍यामुळे किकवी पुलाच्या दोन्ही बाजूचा परिसर जलसमृद्ध झाला आहे.

तालुक्यातील किकवी येथून वाहणारी चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते. परिणामी या नदीच्या परिसरात असलेल्या भागातील गावात उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती जाणवत असते. ते लक्षात घेऊन स्थानिक पाथरज ग्रामपंचायतीकडून किकवी येथे चिल्हार नदीमध्ये बंधारा बांधण्याची मागणी केली जात होती.

त्यानंतर त्या ठिकाणी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने सिमेंट बंधारा मंजूर करण्यात आला होता. साधारण 90 मीटर लांबीचा सिमेंट बंधारा मे 2021मध्ये बांधून पूर्ण झाला होता. त्यानंतर झालेल्या पावसाळ्यात हा बंधारा जोमाने ओसंडून वाहत होता आणि पावसाळा संपताच स्थानिक प्रशासनाने त्या बंधार्‍याला लोखंडी प्लेट लावण्याचे काम वेळेत पूर्ण केले आणि त्यामुळे या सिमेंट बंधार्‍यात पूर्ण क्षमतेने पाणी भरले आहे.

आजच्या घडीच्या त्या बंधार्‍यात किमान 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत पाणी असून कशेळे-खांडस राज्यमार्ग रस्त्यावर हा सिमेंट बंधारा असल्याने त्या बंधार्‍यातील पाणी किकवी पुलाच्या दोन्ही बाजूला साठले असल्याने तो परिसर सिमेंट बंधार्‍यामुळे पाणीदार झाला आहे. त्याच वेळी या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या भागातील शेतकर्‍यांना भाजीपाला शेती करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे या बंधार्‍याबद्दल जलसंधारण विभागाचे कौतुक होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply