Saturday , June 3 2023
Breaking News

देश विकासाची नवी उंची गाठेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’मध्ये विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना भारत यशस्वीपणे करीत आहे. कोरोना संसर्गाचे रुग्णही आता कमी होत आहेत हा एक सकारात्मक संदेश आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेगही वाढत राहावा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी देश विकासाची नवी उंची गाठेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांच्या सहभागाचे रविवारी (दि. 30) कौतुक केले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते.
जनतेशी संवाद साधनाता पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 20 दिवसांत देशातील एक कोटी नागरिकांना आपण प्रिकॉशन डोस दिला. ही खूप मोठी आणि चांगली बाब आहे. आपल्या देशाच्या लसींवर देशवासीयांचा हा विश्वास खूप मोठी ताकद आहे. पुढे बोलताना त्यांनी, 15 ते 18 वर्षे वयोगटातील आतापर्यंत साडेचार कोटी मुलांनी कोरोनावरील लसीचा डोस घेतला असल्याची माहिती दिली.
इंडिया गेटवर नेताजींची डिजिटल प्रतिमा स्थापन करण्यात आली. देशभरातून याचे स्वागत करण्यात आले. यासोबतच इंडिया गेट येथील अमर जवान ज्योत ही जवळच असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यात आली. या भावुक क्षणामुळे अनेक देशवासीयांच्या आणि शहीदांच्या कुटुंबांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अमर जवान ज्योतीप्रमाणे आपले शहीद, त्यांची प्रेरणा आणि बलिदानही अमर आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करणार्‍यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीतील राजपथावर आपण देशाचे शौर्य आणि सामर्थ्याची झलक पाहिली. त्यामुळे सर्वांना अभिमान वाटला आणि प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश आपल्या या प्रयत्नांमधून राष्ट्रीय प्रतिकांना पुन: प्रस्थापित केले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी पद्म आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. पद्म पुरस्कार मिळणार्‍यांमध्ये असे अनेक चेहरे ज्यांना खूप कमी लोक ओळखतात. ते आपल्या देशांचे अनसंग वॉरियर्स आहेत. त्यांनी सामान्य परिस्थितीत असामान्य काम केले, तर शौर्य पुरस्कार विजेत्या लहान मुलांनी साहसी आणि प्रेरणादायी काम केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंह याने एका मिनिटात तब्बल 109 पुश अप्स काढत विक्रम केला आहे. त्याचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदींनी या युवकाकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply