Breaking News

श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळ्याची सांगता

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील खुटुक बांधणवाडा येथे वासुदेव घरत आणि विनोद घरत यांच्या निवासस्थानी श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी (दि. 7) प्रमुख उपस्थिती लाभली.खारघर येथे बुधवारी सुरू झालेल्या श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर सलग तिसर्‍यांदा निवडून आल्याबद्दल ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांनी भगवद्गीता देत त्यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वर्षा नाईक, पनवेल महापालिका युवा मोर्च्याचे अध्यक्ष दिनेश खानावकर, प्रभाकर जोशी आदी उपस्थित होते.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply