खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ रविवारी (दि. 30) सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरला धडकलेल्या कारचा चुराडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला जाऊन समोरून येणार्या कंटेनरच्या खाली घुसली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. रेहान रिजवान अन्सारी (कुर्ला), महावीर राज, सीमा राज, मानसी देवी, शालिनी रूपनारायण राज (सर्व रा. मिरा रोड, ठाणे) मृतांची नावे असून हे सर्व मूळचे हरियाणाचे आहेत. व्यवसायानिमित्त ते दहिसर येथे राहत होते, एका व्यक्तीवर उपचारासाठी ते पुण्याला जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.
Check Also
जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …