Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे उलवे नोड 2 चे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी (दि. 30) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोड सेक्टर 17 प्लॉट क्रमांक 46 मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण केले.

या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजपचे उलवे नोड अध्यक्ष अनंताशेठ ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, उषा देशमुख, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुजाता पाटील, वसंतशेठ पाटील, कमलाकर देशमुख, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, किशोर पाटील, आशिष घरत, विशाल म्हात्रे, रघुनात देशमुख, प्रकाश शिवलकर, अवधेश कुमार महतो, नरेंद्र नाथ तिवारी, डेविस सर, बादल देव, अभिषेक भट्टाचार्य, तुकाराम तोडक, नरेंद्र पोळ, अमोल पाटील, धनंजय तांबे, शरद चौधरी, अविनाश काजबजे, सागर रंधवे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले. तसेच धनंजय तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सेक्टर 17 मधील ग्रीन व्हीव, नीलकंठ प्राइड, मोहन रेसिडेन्सी, ड्रीम हेरिटेज, तेजस हाईटस, साईऑर्चिड, आरएमएस डायमंड, हाऊसिंग सोसायटी या सोसायटीमधील  सदस्य उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply