Breaking News

मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मतदार नोंदणी झाली नाही अशा सर्व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून शनिवारी (दि 2) व रविवारी (दि. 3) या दिवशी नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेबाबत आज कोकणभवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी अशाप्रकारची मोहीम दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत कोकण विभागात प्राप्त अर्ज एकूण 51629 प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदार केंद्रांवर, मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) यांना नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील. यासाठी त्यांच्याकडे पुरेसे नमुना क्रमांक 6, 7, 8 व 8 अ अर्ज उपलब्ध असतील. नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दिनांक 01.01.2019 या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी, मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन सर्व मतदार केंद्रावर, मतदान केंद्रांच्या ठिकाणी आणि गावात चावडी वाचन करण्याच्या सूचना ही देण्यात आलेल्या आहेत. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (इङ) यांची नेमणूक करण्याबाबत, तसेच मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक यांना (इङ) या मोहिमेत उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाबाबत ठशीळवशपलश थशश्रषरीश ीीेलळरींळेप (ठथ) व ग्रामसभा यांना देखील अवगत करण्यात आले आहे. मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटवण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल, तरच मतदान करता येते, करिता मतदारांना त्यांच्याकडील ओळखपत्र असले तरी मतदार यादीत त्यांचे नाव असलेची खातरजमा करावी, असेही आवाहन करण्यात

येत आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply