Breaking News

महाडमध्ये जयंती महोत्सव उत्साहात

महाड : प्रतिनिधी : वरंध बौद्धजन सेवा मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 128 वा जयंती महोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिभूमीतला मी एक कार्यकर्ता असून विधानसभेत मी प्रतिनिधित्व करतो, याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी या वेळी केले.

बबन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रा. जि. प. सदस्य मनोज काळिजकर, शिवसेना शाखाप्रमुख विकास धनावडे, युवा सेनेचे विशाल सकपाळ, जयवंतराव देशमुख, अविनाश देशमुख, सचिन देशमुख, दीपक गायकवाड, सखाराम सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळेच जातीपातीच्या भिंती कोसळून पडल्या आहेत. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणार्‍या महामानवाच्या जयंती सोहळ्याला लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य हे त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळेच मिळाले असल्याचे आमदार गोगावले यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply