Breaking News

मुंबईत भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले

मुंबई : प्रतिनिधी
‘पेगॅसेस’वरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. या वेळी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले.
केंद्र सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार यांची हेरगिरी करीत होते, असा आरोप करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे दादर येथील वसंत स्मृती कार्यालय गाठले. त्या ठिकाणी
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली. त्या वेळी भाजपचेही कार्यकर्ते जमले आणि काँग्रेसच्या आंदोलनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
जर काँग्रेसला काही आक्षेप आहे, तर त्यांनी चर्चेद्वारे मुद्दा मांडावा, मात्र अशा प्रकारे भाजपच्या कार्यालयावर कुणी चालून येणार असेल तर मान्य केले जाणार नाही, आम्ही त्याचा विरोध करू, असे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोवर काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली जाणार नाही, तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी अखेर काँग्रेसचे आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते, ते झिशान सिद्दीकी यांना ताब्यात घेतल्याने काँग्रेसने आंदोलन मागे घेतले.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply