Wednesday , June 7 2023
Breaking News

माजी खासदार गजानन बाबर यांचे कोरोनाने निधन

मावळ : प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र बुधवारी (दि. 2) बाबर यांची प्राणज्योत मालवली.
गजानन बाबर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रथम त्यांना पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांनी गुरुवारी 3.30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गजानन बाबर यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply