खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बुधवारी (दि. 2) वनपस्ती शास्त्र विभाग ,नेचर क्लब आणि आयक्यूएससीतर्फे शाश्वत भविष्यासाठी ओलसर जमीन या विषयावर आभासी व्याख्यान आयेजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी ए.एस.पी महाविद्यालय, देवरूख रत्नागिरी येथील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या व्याख्यानामध्ये डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पणथळीला उदभवणारे धोके, मानवी जीवनावर तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम निर्दशनास आणून दिले व पाणथळे क्षेत्राची उपयुक्तता पटवून दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी प्रमुख पाहूण्याचे आणि उपस्थिताचे स्वागत करून आाजच्या युगातील पाणथळ क्षेत्राचे निसर्गाचा समतोल राखण्याच्या दूष्टीने असलेले महत्त्व विषद केले. नेचर क्लब विभाग प्रमुख प्रा. सफिना मुकादम यांनी प्रमुख पाहुण्याचे परिचय करून दिले, तसेच सुत्रसंचालन ही केले. या व्याख्यानासाठी सर्व प्राध्यापक वुंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. नमिता अखौरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या बीएमएस विभागाच्या प्रा. अंकिता जांगिड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. मीनल मांडवे यांनी अतिथीचे स्वागत केले, तर प्रा. महेश धायगुडे यांनी उपस्थिताचे आभार मानले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जागतिक पााणथळ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमगर प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.