Breaking News

विहुर येथे ड्रोन कॅमेर्‍याद्वारे शूटिंग करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

मुरूड : प्रतिनिधी

समुद्रकिनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांनादेखील विहुर ग्रामपंचायत हद्दीतील मैदानाचे ड्रोन कमेर्‍याद्वारे शूटिंग करणार्‍या दोघाजणांविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायत हद्दीत रौद नावाचे मोठे मैदान आहे. या परिसरातील जागा एका धनिकाने विकत घेतली आहे. जागा मालक आणि विहूर ग्रामस्थ यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान, समुद्र किनारी ड्रोन उडविण्यास जिल्हाधिकार्‍याची बंदी असतांनादेखील सरफराज मोहमद सईद सय्यद (वय 40, रा. नागोठणे, ता. रोहा) व अल्लादिन फैयाज मोबिन (वय 23, रा. बेलसे, ता. पेण) यांनी 30 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या जागेचे ड्रोन कमेर्‍याद्वारे शूटिंग केले. त्याबाबत पोलीस नाईक परेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ड्रोन कमेर्‍याद्वारे शूटिंग करणार्‍या दोघाजणांविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  अधिक तपास पोलीस नाईक वाघमारे करीत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply