Breaking News

भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग संयोजकपदी शर्मिला सत्वे यांची नियुक्ती

माणगाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपच्या संयोजकपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शर्मिला शिवराम सत्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गणेशकाका जगताप, युवानेते विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकताच शर्मिला सत्वे यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले.

शर्मिला सत्वे यांनी माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षा तसेच भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून चांगले काम केले आहे. त्यांच्या कामांची  दखल घेत त्यांची भाजपच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply