Breaking News

बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट ; जत्रा रद्द

पाली : प्रतिनिधी

सुधागड पाली येथील बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी  यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर व  परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र निर्बंध घालण्यात आल्याने यावर्षी यात्रा अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी परवानगी नाही. त्याचप्रमाणे जन्म सोहळ्याच्या कीर्तनास फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. यावर्षी श्री गणेशाची पालखीदेखील साधेपणाने गाडीतून निघेल. तसेच यंदा भाविकांसाठी महाप्रसाद होणार नाही. सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केबल टीव्हीवर व फेसबुक लाईव्हवर दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply