Breaking News

नवी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

नवी मुंबई : बातमीदार

उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचार प्रकरणाने देश हादरला असता त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटले आहेत. या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच नवी मुंबई शहरातही एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

आब्बास शेख (25) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून त्याची पत्नी पाली शेख हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आब्बास शेख हा पत्नी व सहा वर्षाच्या मुलासह नेरुळ गावात राहणार असून त्याच्या घराच्याच बाजूला पीडित मुलगी राहत होती.

आब्बासचा सहा वर्षाचा मुलगा असून त्याचा सांभाळ व्हावा यासाठी त्याने पीडित मुलीला घरी सांभाळण्यासाठी आणले होते.त्याचदरम्यान त्याने त्या चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना काही घडली आहे. या प्रकरणी दोघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे. पत्नी गावी गेल्याचा फायदा घेऊन नराधमाने तब्बल 10 दिवस बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या वेळी नराधमाने पीडित मुलीला सदरील प्रकार आई वडिलांना सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली होती.कालांतराने तिचे पोट दुखू लागल्याने सदरील प्रकार उघडकीस आला आहे. त्यावेळी ती गर्भवती असल्याची बाब मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आली असता त्यांनी याचा जाब आब्बास शेख व तिच्या पत्नीला विचारला. त्यावेळी पाली शेख हिने पतीकडून झालेली चूक मान्य करत पीडित मुलीला शिरवणे गावातील एका खासगी डॉक्टरकडे नेले. व त्या डॉक्टरकडून दोन इंजेक्शन व दोन गोळ्या खाण्यास असा उपचार करून घेतला. या उपचारानंतरही पीडित मुलीचा गर्भ वाढतच गेला. त्यावर पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी आब्बास शेख याला अटक केली.

या प्रकरणात त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. तर आब्बास ची पत्नी पाली शेख ही पीडित मुलीला बलात्कार प्रकरणानंतर उपचारासाठी कोणत्या डॉक्टरकडे घेऊन गेली होती, का गेली होती. असा प्रश्न उपस्थित झाला असून त्या तो कोण डॉक्टर आहे, नेमका कोणता उपचार त्या पीडित मुलीवर करण्यात आला, इंजेक्शन व गोळ्या नेमक्या कशासाठी देण्यात आल्या यासह अनेक तर्क वितर्काना उधाण आले आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली असून एक फरार आहे.

Check Also

मंत्री भरत गोगावले यांचे पनवेलमध्ये जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत …

Leave a Reply