Breaking News

एमजीएममधील जन आरोग्य योजना पूर्ववत सुरू

आमदार प्रशांत ठाकूर व माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवरून कामोठे एमजीएम रुग्णालय निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा लाभ या ठिकाणच्या रुग्णांना मिळत नव्हता. सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी येथे योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर सीताताई  पाटील यांनी केली होती. त्यांनी या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यानुसार या रुग्णालयात ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जवळपास एक हजार आजारांवर मोफत उपचार केले जातात. कोरोना काळात उत्पन्नाची अटसुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेमध्ये 100 टक्के आरोग्याची हमी देण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण एक हजार रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. त्यामध्ये कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाचासुद्धा समावेश होता. कळंबोली जंक्शनला अगदी महामार्गालगत असलेल्या या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दररोज येतात. वेगवेगळ्या आजारांवर या ठिकाणी उपचार केले जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवर उपचार रुग्ण घेत होते, मात्र काही दिवसांपूर्वी एमजीएम रुग्णालयाला या योजनेच्या पॅनेलमधून निलंबित करण्यात आले होते. आर्थिक हेराफेरीचा ठपका रुग्णालय प्रशासनावर ठेवण्यात आल्याचे समजते. यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी हे रुग्णालय योजनेतून निलंबित केले होते.
दरम्यान, एमजीएमव्यतिरिक्त इतर दुसरे मोठे रुग्णालय पनवेल परिसरात नाही. हे रुग्णालय मोक्याच्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा या रुग्णालयात आहेत. त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्यांना येथील उपचार परवडणारे आहेत. जन आरोग्य योजना त्यांच्यासाठी एक प्रकारे संजीवनी आहे. असे असताना या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्यात आल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे मत माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी व्यक्त केले होते.
कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात, पण महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार हे कामोठे एमजीएम रुग्णालयामध्ये जन आरोग्य योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply