Wednesday , June 7 2023
Breaking News

बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करा

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व पनवेल महापालिका प्रशासनाला दिले आहे.

खारघर सेक्टर 3 बेलपाडा स्कायवॉकलगत काही नागरिक गाड्या पार्किंग करुन कामानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. दिवसभर गाड्या तेथे बेकायदेशीर पार्किंग असतात. खारघर स्टेशनवर पार्किंगची सोय असुनसुद्धा नागरिक गाडी कुठेही पार्क करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी तेथे अपघातही होतात. ते लक्षात घेता बेलपाडा येथे बेकायदेशीर पार्किंग करणार्‍यांवर आपण लवकरात लवकर कारवाई करावी, जेणेकरून तेथे राहणार्‍या लोकांची बेकायदेशीर पार्किंगमुळे होणार्‍या त्रासापासून सुटका होईल, असे प्रभाकर घरत यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply