Breaking News

सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद

आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

परवडणार्‍या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड हा सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजने अंतर्गत तळोजा नोडमधील 5,730 परवडणार्‍या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत 10 हजार नागरिकांनी या गृहनिर्माण योजनेत अर्ज नोंदणी केली आहे.

तळोजा हा नवी मुंबईतील वेगाने विकसित होणार्‍या नोडपैकी एक आहे. तळोजा नोड नवी मुंबईतील वेगाने विकसित होणार नोड आहे. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प, यांमुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रोचे आगार तळोजा येथे असून मेट्रो मार्गेही हा नोड सीबीडी बेलापूरला जोडला जाणार आहे. या नोडमधील काही क्षेत्र हे शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाजकेंद्रे, वसतिगृहे इ. सामाजिक उद्देशांकरिता राखीव आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता काही क्षेत्र हे सिडकोकडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होणार आहेत. परवडणार्‍या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी, रोजगार, वाणिज्यिक प्रकल्प यांमुळे तळोजा नोड हा नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

सिडको आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांकरिता नवी मुंबईमध्ये परवडणार्‍या दरातील घरे उपलब्ध करून देत असते. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील संकुले ही तळोजा नोडमध्येही साकारण्यात आली आहेत. सिडकोकडून 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 5,730 घरांपैकी 1,524 घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वरित 4,206 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. या योजनेकरिता 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना तळोजा नोडमध्ये आपले हक्काचे घर घेण्याची व नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये वास्तव्य करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply