Breaking News

आज्जीबाई जेव्हा बुमराहच्या ’यॉर्कर’ची कॉपी करतात…

मँचेस्टर : वृत्तसंस्था

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.  भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला होता, पण आता चक्का आज्जीबाईच बुमराहच्या यॉर्करची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून बुमराह आतापर्यंत 10 कसोटी, 58 वन डे आणि 42 ट्वेन्टी-20 सामने खेळला आहे. त्याने कसोटीत 49, वन डेत 103 आणि ट्वेन्टी-20 51 विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह अव्वल स्थानावर आहे.

अहमदाबादच्या या गोलंदाजाने अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकाविला. गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे बुमराहने टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जाते. डेथ ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या धावा रोखण्याची जबाबदारी बुमराह सक्षमपणे पार पाडतो. विश्वचषक स्पर्धेतही त्याने चोख भूमिका बजावली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहची ही शैली जगभरातील चाहत्यांवर भुरळ पाडत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply