Breaking News

शुटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी
मॉडेल संघ रांजणखार आयोजित 63व्या कोकण विभागीय शूटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविला, तर ए वन संघ मानकुळे उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक मॉडेल रांजणखार संघाने, चतुर्थ क्रमांक मॉर्डन स्टार रांजणखार संघाने प्राप्त केला.
खारेपाटातील मॉडेल रांजणखार संघाने सलग 63व्या वर्षात पदार्पण केले असून सातत्याने स्पर्धा भरवून एक आदर्श निर्माण केला आहे. मंडळाचे अध्यक्ष स्व. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शुटींगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 16 नामांकित संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेत उत्कृष्ट शूटर राजेश पाटील (मांडवखार), उत्कृष्ट डिफेंडर रत्नेश मोकल (मांडवखार), उत्कृष्ट खेळाडू रोहित पाटील (मानकुळे), उत्कृष्ट पंचर वैभव मोकल (मांडवखार) या खेळांडूनी छाप उमटवली. विजेते संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply