Breaking News

वडखळ येथे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम

पेण : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अ‍ॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली.

नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, महिला प्रतिनिधी, कर्मचारी वृंद, प्रदीप म्हात्रे, सखाराम भगत, ग्रामसेवक श्री. धोत्रे या सर्वांनी वडखळ बस स्थानक, ग्रामपंचायत परिसर, पेट्रोल पंप परिसर, महामार्गावरील सर्व दुकाने आणि बाजारपेठ या परिसरातील जवळ जवळ 850 किलो फक्त प्लास्टिक कचरा गोळा करून जेएसडब्ल्यू कंपनीच्या वाशी येथील पुनर्निर्माण केंद्रावर पंचायतीच्या गाडीने पाठविला. यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीचे सामाजिक कार्य अधिकारी रसिक काळे आणि किरण म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या वेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड, रूरल अ‍ॅण्ड यंग फाऊंडेशन या मोहिमेत सहभागी झाले होते.

या वेळी जयवंत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात वडखळ पंचायतच्या या उपक्रमातून आठवड्याला एक दिवस प्लास्टिक कचरा संकलन ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विविध बचत गट, संस्था, युवा मंडळांचा सहभाग वाढावा म्हणून वार्षिक कॅलेंडरच्या माध्यमातून नियोजनाची नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची, तसेच प्लास्टिकमुक्त पंचायतीकडे वाटचाल कशी करता येईल, यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे विचार मांडले. यात पंचायतीच्या सर्व महिला प्रतिनिधींनी देखील पुढाकार घेतला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply