Breaking News

रविवारी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, रामदास ठोंबरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास बूथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply