पनवेल : प्रतिनिधी
कोरोना साथरोगामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पीपीई किट खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत कोरोना चाचण्या (आरटी-पीसाआर) करण्यासाठीच्या दरास मान्यता देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सोमवारची स्थगित सभा मंगळवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली. या वेळी कोरोना साथरोगामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पीपीई किट खरेदसाठी होणार्या खर्चास व दरास मान्यता मिळणे तसेच महापालिका क्षेत्रात कोरोना चाचण्या (आरटी-पीसाआर) करण्यासाठीच्या दरास मान्यता देण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली.
या सभेत पनवेल महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकाम निविदेचा विषय तसेच व्यवसाय परवाने, नवीन कारखाने, नोंदणीकरण, जाहिराती, परवानासंबंधीच्या अनुषंगाने निविदाधारकाच्या दरास मान्यता मिळण्याचा विषय स्थायी समितीच्या सदस्यांनी स्थगित केला.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …