पनवेल मनपा सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम
कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आले.
प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात येत होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचे सभापती प्रमिला पाटील यांनी ठरवले. यामध्ये अमृतवेल, श्री विनायक, श्री राज, अक्षय, स्वामी समर्थ, विश्वशांती, शुभम, आशिर्वाद, स्नेहल या सोसायट्यांमध्ये जाऊन हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये महिला कार्यकर्त्या कविता गुजर, राणी नेहरू राणापुर, लैला शेख तसेच प्रभागातल्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या, अशी भाजप कळंबोली माहिती कार्यालयीन चिटणीस जगदीश खंडेलवाल यांनी दिली.