Breaking News

गव्हाण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 9) ’दहावी नंतर काय?’ या विषयावर तज्ज्ञाचे  व्यवसाय मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

खारघर येथील ’सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या आयटी विभागाच्या विभाग प्रमुख मनीषा पाटील, अर्जुन कदम आणि विकास यादव या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणकोणत्या व्यवसायिक संधी उपलब्ध आहेत, याची इत्यंभूत माहिती दिली.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी तथा समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रम शृंखलेतील ’दहावी नंतर काय ?’ या विषयावर खारघर येथील ह्या तिन्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके व वर्गशिक्षिका चित्रलेखा पाटील व संदीप भोईर या वेळी उपस्थित होते.

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रस्तुत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यासाठी विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख संदीप भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply