Breaking News

ग्रेस फुल हँड्स संस्थेतर्फे महिला दिन उत्साहात

पनवेल ः वार्ताहर

ग्रेस फुल हँड्स सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन शनिवारी (दि. 12) रोजी खांदा कॉलनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास श्वेेता शेट्टी, स्मिता चतुर्वेदी, मानसी ठक्कर, डॉ. मेघना जाधव, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर निधी प्रभू व त्यांच्या विद्यार्थिनी प्रज्ञा पेंडसे, शीतल गायकवाड, प्रेमा भोपी, डॉ. शेलार, निर्मल अरोरा, योगिता कलसी या प्रमुख पाहुण्या होत्या.

निधी प्रभू यांनी या वेळी शास्त्रीय नृत्य सादर केले. मेघा इंगळे यांनी स्व. लता मंगेशकर यांना दिलेली श्रद्धांजली, रजनी पॉल यांचे कॅराओके गायन सत्र, लिटिल चॅम्प अनन्या घायवत यांचे नृत्य सादरीकरण, चाणक्य सूत्रांवरील सत्र ही कार्यक्रमाची वैशिष्ट्ये होती. मानसी ठक्कर आणि स्मिता

चतुर्वेदी यांच्या किमान उपचार सत्राला नागरिकांनी प्रतिसाद दिला. तसेच वंचित महिलांना किराणा सामानाचे वाटप केले. संस्थापक व अध्यक्ष पायल मधोक, नंदिता मने, संध्या सिन्हा, मौसमी बाला, सुरेखा पंडित, बलविंदर कौर परमार, सपना मेहरोत्रा, सपना मेहरोत्रा, सुरेखा पंडित, टीना मोनजी, तर सहसंयोजक म्हणून ग्रेसफुल हँड्स टीमने कार्यक्रम यशस्वी केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply