Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे साबण वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर रोख घालण्याकरिता हात साबणाने साफ करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिका चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिकेतील सफाई कर्मचार्‍यांना महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत साबण वाटप करण्यात आले.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना महामरीचा प्रसार वेगाने होत आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान कक्ष व शेल्टर असोसिएशन, हिंदुस्थान युनिलिव्हर, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना मोती साबणाचे वाटप करण्यात आले.

या वेळी आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसेवक हरेश केणी, उपायुक्त विठ्ठल डाके, संजय शिंदे, सहायक आयुक्त धैर्यशील जाधव, शेल्टर असोसिएशन प्रोजेक्ट मॅनेजर धनश्री गुरव, युनिसेफ प्रोजेक्ट मॅनेजर राजेश खेडे, स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply