मुंबई : प्रतिनिधी
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात आले.
या सोहळ्याला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या संविधानानुसार आम्ही भारताचे लोक हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉलदेखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्गार या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
Check Also
जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …