Breaking News

सीकेटी विद्यालयात विशेष पालक सभा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमातील विद्यालयात शनिवारी (दि. 12) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पालक सभा आयोजित केली होती.

या सभेत 2021-22 मध्ये इयत्ता नववीत शिकत असलेले हे विद्यार्थी मार्च 2023मध्ये दहावी बोर्ड परिक्षेस सामोरे जातील, परंतु गेली दोन वर्षे कोरोना काळात हे विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण फार कमी काळ घेऊ शकले. सर्व भर ऑनलाईन शिक्षणावरच दिला गेला होता. या परिस्थितीचा विचार करता पुढील वर्षातील अभ्यासाचे नियोजन विद्यार्थ्यांनी कसे करावे, अभ्यासक्रमातील कोणत्या कठीण भागांवर लक्ष केंद्रित करून पाया मजबुत करावा, सर्व विषयांचा अभ्यास करताना वेळेचे व्यवस्थापन कसे करावे या अनेक बाबींवर या सभेमधे उहापोह करण्यात आला. विषय शिक्षकांनी पालक आणि विद्यार्थ्यांना संयुक्त मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी या वेळी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पाल्याची विद्यालयातील उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे तसेच वर्षभरातील सराव परिक्षा, प्रश्नसंच सोडवणे हे अत्यंत गरजेचे असून या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी शाळा करून घेत असते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आमचे शिक्षक सदैव तत्पर असतात. या सभेला साधारण 100 पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पालकसभेस आर्याप्रहर वृत्तपत्राचे संपादन सुधीर पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे …

Leave a Reply