Breaking News

ब्रम्हगुरु फाउंडेशनतर्फे आदिवासीवाडीत ब्लँकेटचे वाटप

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांसाठी माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मगुरु फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांना माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ब्रम्हगुरु फाऊंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करण्यात आले. समाजातील आदिवासी बांधवांना अनेक सुखसुविधा मिळाव्या हा मुख्य उद्देश या संस्थेचा असून त्यासाठी ही संस्था कार्य करत आहे. आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण होण्यासाठी संस्थेमार्फत 200 ब्लँकेट वाटप करण्यात आले. चिंचवली-गणेगाव येथे गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी ब्र्हमगुरू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत शिवाजी शिंदे, ट्रस्टी ब्रिजेश राजेंद्र सिंग, कॅप्टन अंशु अभिषेक, प्रशांत ब्रिजेश सिंग, सत्यम देवेंद्र सिंग यांच्या मार्फत ब्लँकेट वाटण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षी संतोष मोहिते, सदस्य अ‍ॅड. संपत पांडुरंग हडप, शैला नामदेव हिलम, ज्येष्ठ ग्रामस्थ दशरथ बाबुराव देशमुख उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply